शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

आंदोलनांचा सांगलीत भडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 23:46 IST

सांगली : अनिकेत कोथळे च्या खूनप्रकरणी मंगळवारी सांगलीत आंदोलनांचा भडका उडाला. वेगवेगळ््या संघटनांनी ठिय्या आंदोलन, रास्ता रोको, निदर्शने, कँडल मार्च काढून पोलिसांच्या कृत्याबद्दल संताप व्यक्त केला. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्यासह २५ महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.अनिकेत कोथळे खूनप्रकरणी शहरात गेल्या आठ दिवसांपासून विविधसमाजिक संघटना व पक्षांच्यावतीने आंदोलन सुरू आहे. ...

सांगली : अनिकेत कोथळेच्या खूनप्रकरणी मंगळवारी सांगलीत आंदोलनांचा भडका उडाला. वेगवेगळ््या संघटनांनी ठिय्या आंदोलन, रास्ता रोको, निदर्शने, कँडल मार्च काढून पोलिसांच्या कृत्याबद्दल संताप व्यक्त केला. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्यासह २५ महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.अनिकेत कोथळे खूनप्रकरणी शहरात गेल्या आठ दिवसांपासून विविधसमाजिक संघटना व पक्षांच्यावतीने आंदोलन सुरू आहे. तृप्ती देसाई सोमवारी सांगलीत आल्या होत्या. त्यांनी अनिकेतच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. वरिष्ठ पोलीस अधिकाºयांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करावी, निलंबित पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेसह अटकेतील सर्वच संशयितांना ‘मोक्का’ लावावा, मुख्यमंत्र्यांनी सांगलीला भेटद्यावी, अशी त्यांनी मागणी केली होती.याच मागणीसाठी त्यांनी मंगळवारी सकाळी शहर पोलीस ठाण्यासमोर प्रथम ठिय्या आंदोलन केले. त्यांनतर रास्ता रोको सुरू केला. ूपलोंढे, माधुरी शिंदे, राणी कदम, गुंठेवारी संघर्ष चळवळ समितीचे अध्यक्ष चंदन चव्हाण, माधवी बेळगे, शीतल ऐनापुरे आदी सहभागी झाले होते. आंदोलकांनी पोलिसांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.राष्टÑविकास सेनेचे अध्यक्ष अमोस मोरे व सुधाकर गायकवाड यांनी कार्यकर्त्यांसोबत शहर पोलिस ठाण्याच्या आवारात ‘वळू’ सोडून अनोखे आंदोलन केले. वरिष्ठ पोलिस अधिकाºयांच्या नावाचा वळूच्या पाठीवर उल्लेख करून त्यांना ‘हटाव’ अशी मागणी केली होती. त्यांच्या या आंदोलनामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. अनिकेतच्या खूनप्रकरणी सीआयडीने गतीने तपास करावा. हा खटला जलदगती न्यायालयात चालवून कामटेसह सर्वांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली.पोलिसांची पळापळगृहमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री सुभाष देशमुख हे अनिकेत कोथळे कुटुंबास दहा लाखांच्या मदतीचा धनादेश देण्यास दुपारी येणार होते. तृप्ती देसाई यांना याची माहिती मिळताच त्या कार्यकर्त्यांसह अनिकेतच्या घरी गेल्या. मंत्र्यांना येथे फिरकू देणार नाही, असा त्यांना इशारा दिला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा अनिकेतच्या घराजवळ दाखल झाला. शेवटी कोथळे कुटुंबास सीआयडीने चौकशीसाठी बोलाविले आहे, असे सांगून शासकीय विश्रामगृहात नेण्यात आले. तिथेच मंत्र्यांकडून मदतीचा धनादेश देण्याचे ठरले. ही बाब तृप्ती देसाई यांना समजताच त्यांनी कोथळे कुटुंबाशी संवाद साधून धनादेश तुमच्या घरीच स्वीकारा, अशी विनंती केली. त्यामुळे पुन्हा कोथळे कुटुंब घरी आले. मंत्र्यांसमोर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी तृप्ती देसार्इंसह २५ महिलांना ताब्यात घेऊन त्यांना थेट मिरज पोलिस ठाण्यात हलविले. यावेळी पोलिस व आंदोलक महिलांमध्ये जोरदार झटापट झाली. त्यानंतर मंत्री केसरकर व देशमुख यांनी कोथळे कुटुंबाच्या घरी भेट देऊन त्यांना मदतीचा धनादेश दिला. यादरम्यान पोलिसांची मात्र चांगलीच पळापळ झाली.दोघीजण बेशुद्ध पडल्यामिरज शहर पोलिस ठाण्यात गेल्यानंतर आंदोलकांनी मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांनी बांगड्या घाला, अशी घोषणाबाजी सुरू केली. पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार व महिला पोलिस कर्मचाºयांसोबत आंदोलकांची वादावादी झाली. घोषणा देताना रेखा सूर्यवंशी, शबाना मुल्ला (रा. कराड) व निखिल पन्हाळे हा तृतीयपंथी चक्कर येऊन पडले. पोलिस वाहनातून त्यांना रुग्णालयात नेण्यास आंदोलकांनी विरोध केला. यामुळे रुग्णवाहिका आणून त्यांना शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. दोन तासानंतर पोलिसांनी ज्योती आदाटे, माधुरी शिंदे, कल्पना चव्हाण, सीता राऊत, मीनाक्षी शिंदे, शीतल ऐनापुरे, राणी कदम, प्रियंका तूपदळे, माधुरी टोणपे या आंदोलकांना सांगलीला नेले.